…आणि अखेर त्या शिक्षकाने मृत्यूला कवटाळले

…आणि अखेर त्या शिक्षकाने मृत्यूला कवटाळले

1640
0
अनेक वर्ष विना-अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम करुनही वेतन मिळालं नाही म्हणून भंडारा जिल्ह्यातल्या एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे. केशव गोबार्डे असं या शिक्षकाचं नाव आहे. आदिवासी विकास विद्यालय विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, मोरगाव ता. अर्जुनी जि. गोंदिया येथे मागील १५ वर्षांपासून विना अनुदानित तत्वावर काम करत होते.
आज ना उद्या लवकरच पगार सुरु होईल या आशेवर ते अतिशय विवंचनेत असत. परंतु परीस्थिती असहाय्य झाल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बोबडे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांची पत्नी आणि मुलं आर्थिक विवंचनेमुळे माहेरी रहात होती. आई अतिशय आजारी असते.
या घटनेमुळे जिल्ह्यातल्या शिक्षकांमध्ये मोठा संताप आहे. सरकार आणखी किती शिक्षकांचा बळी गेल्यावर अनुदान देण्याचा विचार करणारंय असा सवाल हे शिक्षक विचारत आहेत. जोपर्यंत बोबडे यांच्या कुटुंबाकरता सानुग्रह अनुदान मंजूर होत नाही तोपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कृती समितीने घेतलाय.