Home News Update प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत नागरिकत्व बिलाला पाठिंबा नाही- उध्दव ठाकरे

प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत नागरिकत्व बिलाला पाठिंबा नाही- उध्दव ठाकरे

Chief Minister of Maharashtra Uddhav thackeray
Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

नागरिकत्व बिलाला पाठिंबा देण्यावरून आज शिवसेनेने (ShivSena) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत पाठिंबा देणार नाही असं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) अडचणीत वाढ झाली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं मतदान केलं म्हणजे देशभक्ती आणि त्यांच्या विरोधात मतदान करणं हा देशद्रोह आहे, ही मानसिकता बदलायला हवी असं सांगून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला टोला लगावला.

“यापेक्षा लोकांच्या जीवनातील रोजचे आवश्यक प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे. आम्ही काय भूमिका घ्यावी हे आम्हाला कोणी शिकवू नये.” असंही ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

नागरिकत्व बिलावर (Citizenship Amendment Bill) काल शिवसेनेने समर्थन दिलं, पण त्याच बरोबर काही प्रश्नं उपस्थित केले असून त्यांची उत्तर मिळालीच पाहिजेत असंही ते म्हणाले. आमच्यासारखे सर्वच पक्ष देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करतील. या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता येणं आवश्यक आहे.

राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाण्यापूर्वी त्यामध्ये सुचवलेल्या सुचनांची दखल घेणं आवश्यक आहे. तसंच अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

नागरिकत्व बिलाला पाठिंबा देताना बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले राष्ट्रीयत्व त्यात असल्याने आम्ही पाठिंबा दिला असं ते म्हणाले. नागरिकत्व बिल आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे त्यावर शिवसेनेची भूमिका काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997