कृषीमंत्री रमले मित्रपरिवाराच्या भेटीगाठीत

कृषीमंत्री रमले मित्रपरिवाराच्या भेटीगाठीत

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी संकटात असून एकीकडे दुष्काळ, शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीयेत, बँका पेरणीसाठी कर्ज देत नाहीत तर दुसरीकडे नुकताच पावसाळा सुरु झाल्याने जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांची शेती पाण्याने खरडून गेलीय.

याची प्रशासनाने अद्यापही पाहणी केली नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय. अशा परिस्थितीत शनिवारी (6 जुलै) सायंकाळी राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा जिल्हा दौरा झाला आणि  यापैकी कुठल्याच समस्येवर कृषीमंत्री बोंडे यांनी शेतकऱ्याची भेट हि घेतली नाही किंवा शेताची साधी पाहणी हि केली नाही, आणि त्यांच्या या दौऱ्यात त्याचा उल्लेख  हि  नव्हता.

या शासकीय दौऱ्यामध्ये सायंकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत कृषीमंत्र्यांनी खामगाव, चिखली , देऊळगाव राजा येथे नातेवाईकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत औरंगाबाद कडे प्रयाण केले. या दौऱ्यात डॉ. बोंडे यांनी गजानन महाराज यांचं दर्शन घेत मित्र मंडळी , नातेवाईक , आणि जवळच्या नेत्यांचे , कार्यकर्त्यांचं घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. फटाक्यांच्या आतषबाजीत हारतुरे स्वीकारले.

दरम्यान कृषीमंत्र्यांनी आमदार आकाश  फुंडकर यांच्या घरी भेट दिली. हा दौरा नातेवाईकांसाठी की शेतकऱ्यांसाठी ? असा प्रश्न विचारल्या जातोय.