Home News Update मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा हा निर्णय फिरवला !

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा हा निर्णय फिरवला !

Support MaxMaharashtra

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास विरोध न करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. पण या निर्णयामुळे राज्य सरकारमधील पक्षांमध्ये मतभेद असल्याचं उघड आहे. गृहमंत्री म्हणून आपण या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास विरोध करण्याची भूमिका घेतली होती.

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास NIA कडेच?

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास NIA कडेच?एल्गार परिषद प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतभेद..#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 13 फ़रवरी 2020

पण मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रालयाचा निर्णय ओव्हररुल करण्याचा अधिकार असल्याने त्यांनी एनआयएकडे तपास वर्ग करण्यास मान्यता दिली अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. एल्गार परिषद प्रकरणी तत्कालीन भाजप सरकारनं जाणूनबुजून काही लोकांना गोवल्याचा आरोप करत शरद पवार यांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

पण त्यानंतर लगेचच केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला. पण त्याला राज्य सरकारनं सुरूवातीला कोर्टात विरोध केला होता. पण अखेर राष्ट्रवादीचा विरोध झुगारात मुख्यमंत्र्यांनी हा तपास एनआयएकडे देण्यास विरोध नसल्याचा निर्णय दिलाय.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997