Home > News Update > देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा ?

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा ?

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा ?
X

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष करत आहेत. त्यातच आता भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देखील या संदर्भात वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळातील 65 हजार कोटी रुपयांच्या खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र अद्याप सादर केलेले नसल्यानं, त्यात घोटाळा झालाच असावा, असं आज तरी स्पष्ट होत असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.

त्यामुळं खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळातील 65 हजार कोटी रुपयांच्या खर्चाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्यानं कॅगच्या लेखापरीक्षकांनी यावर ठपका ठेवला आहे. याच मुद्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

कॅगचे परीक्षण ही दरवर्षी निरंतर होणारी प्रक्रिया आहे. हा विषय काही फक्त फडणवीस सरकारपुरता मर्यादित नाही. काँग्रेसच्या काळातही असे प्राथमिक अहवाल आले आहेत. सरकारने केलेल्या खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावी लागतात. जर फडणवीस सरकारने 65 हजार कोटी रुपयांच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रं सादर केली तर त्यात गैरव्यवहार झाल्याचं म्हणता येणार नाही. मात्र, आज मितीला त्यांनी ही प्रमाणपत्रे सादर केलेली नसल्याने लेखापरीक्षकांनी ठपका ठेवला आहे. त्यामुळे 65 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे मत खडसेंनी मांडलं आहे.

महाआघाडी सरकारच्या कर्ज माफीचा निर्णयाच स्वागत-

विद्यमान उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. या कर्जमाफीचे निकष अद्याप स्पष्ट केलेले नसले तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असं म्हणता येईल. गेल्या सरकारने केलेली कर्जमाफी, आता 2 लाख रुपयांपुढे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणते निकष आहेत, हे माहिती नसल्यानं आपण जास्त बोलणं योग्य नाही असं त्यांनी सांगितलं.

माझ्या पक्षांतराच्या बातम्या चुकीच्या -

आपल्याला त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आपण लवकरच पक्षांतर करू, अशी भूमिका खडसेंनी 2 दिवसांपूर्वी जाहीर केली होती. मात्र, आज त्यांनी पक्षांतराच्या विषयावर घुमजाव केले. माझ्या पक्षांतर करण्याच्या बातम्या चुकीच्या असून आपला तसा निर्णय झाला नसल्याचं सांगत त्यांनी बोलण्याचं टाळलं.

Updated : 22 Dec 2019 5:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top