Home > News Update > जात अजून संपली नाही अल्पवयीन भीमराज चा भीषण खून

जात अजून संपली नाही अल्पवयीन भीमराज चा भीषण खून

जात अजून संपली नाही अल्पवयीन भीमराज चा भीषण खून
X

आंतरजातीय प्रेम संबंधातून औरंगाबाद जिल्ह्यात एका तरुणाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भीमराज बाळासाहेब गायकवाड (वय १७) असं मृत तरुणाचं नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे शेजारच्या वस्तीवर राहणाऱ्या भीमराज गायकवाड यांचा भाऊ आणि देवधर कुटुंबातील मुलगी प्रेमसंबंधामुळे घरात पळून गेल्याचा तरुणीच्या कुटुंबियांचा संशय होता. या संशयातूनच तरुणीच्या कुटुंबियांनी तरुणाच्या अल्पवयीन भावाची गळा चिरून निघृण हत्या केली.

पोलिसांनी यामध्ये रोहिदास देवकर आणि देविदास देवकर अशा दोन आरोपींनी ताब्यात घेतलं आहे. या दोनही आरोपींवर खुनासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता, आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नक्की प्रकरण?

देविदास देवधर यांची मुलगी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यातच त्यांच्या शेजारी असणारे बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अमोल गायकवाड (वय २२) हा देखील गेल्या 12 मार्च पासून घरात नाही. त्यामुळे अमोल आणि देवधर यांची मुलगी घरातून पळून गेले आहेत. असा संशय मनात धरुन याच रागातून तरुणीच्या वडीलांनी आणि काकांनी बेपत्ता तरुणाच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात अमोल चा भाऊ भीमराव यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली.

Updated : 18 March 2020 5:58 AM GMT
Next Story
Share it
Top