Home > News Update > LIVE HowdyModi: पंतप्रधान नरेंद्र मोदी

LIVE HowdyModi: पंतप्रधान नरेंद्र मोदी

LIVE HowdyModi: पंतप्रधान नरेंद्र मोदी
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM MODI) आज 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन शहरात भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधत आहेत. काय आहे हा कार्य़क्रम?

पाहा...

टेक्सास शहराच्या ह्यूस्टन एनआरजी स्टेडियम मध्ये टेक्सास इंडिया फोरम (TIF) ने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची 50 हजार तिकिटं विकली गेली आहेत. तर काही लोक आजही वेटींग लिस्टमध्ये आहेत.

'हाउडी मोदी' कार्यक्रम 1,000 पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था आणि टेक्सासमधील 650 अधिक संघटनांच्या मदतीने आयोजित करण्यात आला आहे. वेबसाइट च्या माहितीनुसार 71,995 क्षमता असलेल्या एनआरजी फुटबाल स्टेडियम मध्ये अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 8.45 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल आणि दुपारी 12.30 ला संपेल.

विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप उपस्थित राहणार आहेत. भारतीय वंशाच्या या शो मध्ये तीन तासांच्या सर्व कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये कलाकार अन्य भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीत आणि नृत्य सादर करतील.

पंतप्रधानांसाठी खास 'डांडिया' नृत्य सादर केलं जाणार आहे. हाउडी मोदी प्रोग्राम (Howdy Modi) अमेरिका आणि भारत च्या द्विपक्षीय संबंधासाठी महत्वाचा मानला जात आहे. एका अधिकाऱ्या च्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान चे पंतप्रधान इमरान खान, पोलेंड चे राष्ट्रपती आंद्ररेज सेबस्तिआन, सिंगापुर चे पंतप्रधान, इजिप्त चे राष्ट्रपती, साउथ कोरिया चे राष्ट्रपती आणि न्यूजीलैंड च्या पंतप्रधानांशी बातचित करणार आहे.

Updated : 22 Sep 2019 7:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top