Home > News Update > कोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल?

कोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल?

कोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल?
X

तुमच्या जर सतत छातीत दुखत असेल, मळमळ, पचनक्रिया, उलट्या, थकवा, वारंवार डोकेदुखीचा त्रास असेल तर ही लक्षण हृदयविकाराची असू शकतात. आज जागतिक ह्रदय दिन त्यानिमित्ताने आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवावं या संदर्भात डॉ. रवी गुप्ता यांनी केलेलं मार्गदर्शन नक्की वाचा

भारतात कोरोनाव्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि बरेच लोक या आजाराला बळी पडले आहेत. कोरोना सारख्या आजाराच्या संक्रमण काळात वेळीच काळजी न घेतल्यास गंभीर श्वसन विकारांना आमंत्रण देते. जेव्हा हृदयाला रक्त पुरवठा होण्यात अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो.

कोरोना व्हायरस सारख्या साथीच्या आजारात प्रत्येकाने स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे. तीव्र हार्ट अटॅकची लक्षणांमध्ये छातीत दुखणे, मळमळ होणे, पचन, उलट्या होणे, थकवा जाणवणे आणि हलकीशी डोकेदुखी यांचा समावेश आहे. व्यक्तींनुसार ही लक्षणेही बदलू शकतात. चूकीची जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि कौटुंबिक इतिहास ही हार्ट अटॅकची कारणे असू शकतात.

म्हणूनच, जर आपल्याला किंवा आपल्या जवळील एखाद्या व्यक्तीस तीव्र हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा भविष्यात अशा समस्यांचा सामना करावा लागू नये. असे वाटत असल्यास खाली दिलेल्या या सूचनांचे पालन करा आणि निरोगी रहा.

  • जर एखाद्यास तीव्र हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्वरित उपचार घेण्यासाठी रूग्णवाहिकेतून त्याला ताबडतोब रूग्णालयात घेऊन जा. त्या व्यक्तीस चालू देऊ नका. वेळेवर देण्यात येणा-या औषधांविषयी डॉक्टरांशी बोला.

  • एकदा जर आपण हार्ट अटॅकवर मात केली तर मात्र, दररोज व्यायाम करून शारीरिकरित्या सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. आपण घरच्या घरी चालणे किंवा उद्यानात फिरू शकता, एरोबिक्स आणि योगा यांसारख्या पर्यायांची निवड करू शकता. मेडीटेशन सारख्या तणामुक्त राहण्यास मदत करण्याच्या तंत्रांची मदत घ्या. कोविड १९ सारख्या संक्रमण कालावधीत आपण तणावमुक्त रहावे.

  • गरज नसल्यास घराबाहेर जाऊ नका आणि आजारी माणसांच्या आसपास राहणे टाळा, जेणेकरून अधिक समस्या उद्भवू शकतात. आपल्याकडे आपल्याकडे औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही? याची खात्री करून घ्या.

  • सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करा. आपले तोंड मास्कचा वापर करून झाकून घ्या आणि वेळोवेळी आपले हात स्वच्छ करा. तसेच, आपले हात व्यवस्थित धुण्यास आणि हाताची स्वच्छता राखण्यास विसरू नका. हे पहा की आपण कोणत्याही पृष्ठभागास स्पर्श करीत नाही. कारण डोरकनॉब्ज, डोअर हँडल्स, स्विच इत्यादी या स्त्रोतांमधून संसर्ग होण्याचा धोका आहे.

  • संतुलित आहाराचे सेवन करा. निरोगी आणि सक्रीय रहा. जंकफुड, तेलकट, प्रक्रिया केलेले आणि खारट पदार्थांचे सेवन टाळा. ताजी फळे, भाज्या, धान्य, कडधान्य, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करायला विसरू नका. आपल्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी शारीरीक तपासणी करून घ्या. मेदयुक्त पदार्थ, कार्बोहायड्रेट आणि कृत्रिम चव असलेले पदार्थ खाऊ नका. आहारामध्ये कमीतकमी तेलाचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरेशी झोप घ्या आणि वळोवेळी शारीरीक विश्रांती घ्या.

  • दूरध्वनी किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्कात रहा. आपल्या प्रियजनांशी मनमोकळ्या गप्पा मारा व तणामुक्त राहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला पेंटिंग किंवा बागकाम आवडत असल्यास नक्कीच आपला वेळ यामध्ये गुंतविण्याचा प्रयत्न करा.

  • गरज नसल्यास बाहेर न पडता टेलिमेडिसिन किंवा व्हिडिओ कॉल मार्फत सल्ला घेण्याचा पर्याय निवडा.

  • वेळोवेळी आपला रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीची पाहणी करा. याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा.

डॉ. रवी गुप्ता, हृदय रोग तज्ज्ञ, वोक्खार्ट हॉस्पिटल, दक्षिण मुंबई

Updated : 29 Sep 2020 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top