Top
Home > News Update > मुंबईकरांनो घराबाहेर पडताना खबरदारी घ्या अन्यथा...

मुंबईकरांनो घराबाहेर पडताना खबरदारी घ्या अन्यथा...

मुंबईकरांनो घराबाहेर पडताना खबरदारी घ्या अन्यथा...
X

कोविड १९ संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेले लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने शिथील करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न होत असताना काही नागरिकांकडून संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मास्कचा वापर व्यवस्थित केला जात नाही. यामुळे सार्वजनिक स्थळं, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱयांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन कोविड १९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग वाढू शकतो, असे वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र तरीही काही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याने त्यांची वैयक्तिक व इतरांचीही सुरक्षितता धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लहान निर्णय घेतला आहे.

कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल.

प्रमाणित (स्टँडर्ड) मास्क, तीन स्तरांचे (थ्री प्लाय) मास्क किंवा औषधी दुकानदारांकडे उपलब्ध असलेले साध्या कापडाचे मास्क यासह घरगुती तयार केलेले, निर्जंतुकीकरण करुन वारंवार वापरात येणारे मास्क यांचाही उपयोग नागरिक करु शकतात.

महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या या निर्देशांचे उल्लंघन करणाऱयांवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा प्रत्येक उल्लंघनासाठी रुपये एक हजार इतका दंड आकारण्यात येईल.

Updated : 29 Jun 2020 12:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top