राजस्थान मध्ये राजकीय भूकंप? सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाचे सर्व दरवाजे खुले: कॉग्रेस

राजस्थान मध्ये राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये वाद सुरु आहे. या वादामुळे सचिन पायलट सध्या भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाने कितीही षडयंत्र रचलं तरी राजस्थानमधील सरकार मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

राजस्थानमधील सरकार स्थिर असून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु असा विश्वास आहे. भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी कोणतंही षडयंत्र रचलं तरी यश मिळणार नाही. कुटुंबात जर कोणी नाराज असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करुन त्यावर उपाय शोधला पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यातर्फे मी सांगू इच्छितो की, सचिन पायलट आणि इतर कोणत्याही सदस्यांसाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे नेहमी खुले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here