Home > News Update > देणार नाही, पण आहेत माझ्याकडे पुरावे; 'तुमच्या'कडे आहेत का?

देणार नाही, पण आहेत माझ्याकडे पुरावे; 'तुमच्या'कडे आहेत का?

देणार नाही, पण आहेत माझ्याकडे पुरावे; तुमच्याकडे आहेत का?
X

उद्या कुणी मला माझे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे मागायला आलेच तर मी माझी निषेधाची कृती म्हणून ते देणार नाहीच पण याचा अर्थ माझ्याकडे पुरावेच नाहीत असे नाही. माझे काका, आजोबा महादेवराव कनाटे, आणि माझे वडील वामनराव कनाटे हे दोघेही १९४७ च्या आधी वेगवेगळ्या आंदोलनांत भाग घेतल्यामुळे तुरुंगात शिक्षा भोगून आले आहेत.

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित

उध्दव ठाकरेंची तिरंदाजी

दोघांच्याही नावांची नोंद अमरावती आणि नागपूरच्या तुरुंगाच्या कागदपत्रांत आहे. भारत सरकारने इंदिरा गांधी पंतप्रधान असताना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची एक देशव्यापी सुचीही तयार केली होती. त्यातही या दोघांच्या नावांची नोंद आहे. आज माझ्या आजूबाजूला जे लोक 'CAA' आणि 'NRC' चे समर्थन करतात त्यामुळे काय हरकत आहे पुरावे द्यायला, असा युक्तिवाद करत आहात त्यांच्यापैकी कुणाच्या आजोबांची किंवा वडिलांची नावं या सूचीत आहेत का, याचा शोध घ्यावा म्हणतो.

Updated : 21 Dec 2019 3:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top