#MunnaBhaiMBBS का झाला ट्रेंड?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह येथील लष्कराच्या रुग्णालयाला भेट देऊन जखमी सेैनिकांची विचारपूस केली आणि त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी भाषण ही केलं. या भेटीचे फोटो तसंच व्हिडीयो सरकारतर्फे अधिकृतरित्या रिलिज करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या व्हिडीयो आणि फोटो नंतर सोशल मिडीया वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी लष्कराचा वापर करत असून लष्कराने अशा चमकोगिरीचा विरोध केला पाहिजे असं मत सोशल मिडीया वर व्यक्त करण्यात आलं आहे. #MunnaBhaiMBBS असा ट्रेंड ही सोशल मिडीयावर चालवण्यात आला आहे. या ट्रेंड मध्ये सामिल झालेल्या नेटकऱ्यांनी कॉन्फरन्स हॉल ला रूग्णालयात परावर्तित करण्यात आल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. रूग्णालयात प्रोजेक्टर चं काय काम असा ही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. रूग्णालय दाखवण्याच्या नादात मुन्नाभाई चित्रपटाप्रमाणे वॉर्ड चा सेट उभारण्यात आला, मात्र तिथे वैद्यकीय उपकरणं ही लावण्याचं प्रसंगावधान बाळगण्यात आलं नाही अशी टीका सोशल मिडीयावर करण्यात आली आहे.

सोशल मिडीयावर व्यक्त झालेल्या काही प्रतिक्रीयांचे स्क्रीन शॉट पाहुयात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here