का वाढली अमेरिकेची चिंता?

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० लाख १० हजार ७१७वर पोहोचली आहे. तर जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार मृतांची संख्या ५८ हजार ३६५ झाली आहे. तर जगभरातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३१ लाख १० हजार २१९ एवढी झाली आहे.

अमेरिकेतील सर्वाधिक रुग्ण हे एकट्या न्यूयॉर्क राज्यात आहेत. इथली कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ९० हजार एवढी आहे. तर न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे १ लाख ६० हजार रुग्ण आहेत. दरम्यान न्यूयॉर्कमध्ये १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पण त्यानंतर काही भागांमध्ये परिस्थिती पाहून लॉकडाऊन शिथिल केले जाईल अशी माहिती न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुआमो यांनी दिली आहे.