Home > News Update > उद्धटपणे आण्णा हजारे यांच्यावर टीका करणाऱ्यांना विश्वंभरी चौधरी यांचं चॅलेंज

उद्धटपणे आण्णा हजारे यांच्यावर टीका करणाऱ्यांना विश्वंभरी चौधरी यांचं चॅलेंज

उद्धटपणे आण्णा हजारे यांच्यावर टीका करणाऱ्यांना विश्वंभरी चौधरी यांचं चॅलेंज
X

आण्णा हजारे यांनी राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचं अद्यापपर्यंत खाते वाटप झालं नसल्यावरुन सरकारवर टीका केली होती. त्यानंतर समाजसेवक आण्णा हजारे यांच्यावर सोशल मीडियावर चांगलीच टीका झाली आहे. यावर समाजीक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी एक पोस्ट लिहून या टीकाकारांना उत्तर दिलं आहे. काय म्हटलंय विश्वंभर चौधरी यांनी

हे ही वाचा

गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

गांधीजी आम्हाला माफ करा – हेमंत देसाई

अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी

अण्णांच्या काही भूमीकांशी मी अजिबात सहमत नाही. आणि ते उघडपणे बोलून दाखवतो. पण मला काही महत्वाचे प्रश्न पडतात ते इथं उपस्थित करतो:

1. मोदी समर्थक जसे 'सत्तर वर्षा'तून बाहेर येत नाहीत तसंच कॉंग्रेस समर्थक 2014 तून बाहेर येत नाहीत का? 2014 साली कॉग्रेस अण्णांमुळे हारली, कबूल. 2019 साली कोणामुळे हारली? तेव्हा तर उपोषण झाले नव्हते कॉंग्रेस विरोधात! अण्णांच्या नावानं आणखी किती रूदाली करत बसणार? जेपी जाईपर्यंत जेपी होते, आता अण्णा! एकच एक माणूस येतो आणि हरवून जातो, काय पार्टी आहे का नाटक पार्टी?

2. अण्णांना संघी म्हणा, ज्यांनी न मागता पाठींबे दिले, सरकारात गेले, त्यांना कधी म्हणणार? विहिंप आणि संघाचे लाड करून अयोध्येत मंदिराचे कुलूप उघडणारे- त्यांना संघी कधी म्हणणार?

3. अण्णा 2014 पासून झोपले होते का? हो समजा झोपले असतील, पण मग (बोटावर मोजता येणारे अपवाद वगळून) उरलेले सव्वाशे करोडच्या देशातले बाकी 1,24,99,999 काय करत होते? त्यातला कोणी का उपोषणाला बसला नाही? देशात एकच माणूस आहे का? जो सरकारं पाडू शकतो, किंवा उर्वरित एकशे चोवीस कोटी नव्व्याण्णव लाख नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णव लोकांना उपोषण करून प्रेरित करू शकतो?

सभ्य भाषेत टीका मी समजू शकतो, उद्धटपणाला मात्र मर्यादा असली पाहिजे. देशासाठी 145 दिवस सोडा, 145 तास उपोषण करून दाखवा.

Updated : 11 Dec 2019 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top