Home > News Update > कुमार केतकर आहेत कुठे?

कुमार केतकर आहेत कुठे?

कुमार केतकर आहेत कुठे?
X

विधानसभा निवडणुकांच्या काळात गायब असल्याचा आरोप झालेले कुमार केतकर कोरोना सारख्या आपत्तीत हूी कुठे दिसत नाहीत अशी टिका होऊ लागलीय. कुमार केतकर राज्यातल्या संपूर्ण सत्ता स्थापनेच्या गोंधळात गायब राहिले, तसंच राज्यावर संकट आलेलं असतानाही ते दिसत नाहीयत अशी टिका करणाऱ्यांना खासदार कुमार केतकर यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

कुमार केतकर यांनी आपल्या खासदार फंडातून कस्तुरबा रूग्णालय, जे.जे. रूग्णालय, सेंट जॉर्जेस रूग्णालय आणि ठाणे सिव्हील रूग्णालयाला प्रत्येकी 25 लाखांचा खासदार निधी दिला आहे. खासदारकीची शपथ घेतल्यापासून त्यांच्यावर अनेक लोकप्रतिनिधींनी खासदार फंडाच्या उपयोगावरूनही टीका केली होती.

मात्र कुमार केतकर यांनी आपला फंड फक्त रुग्णालये तसंच वाचनालयांसाठीच द्यायचं ठरवलं होतं. आज त्यांच्या या निर्णयाची उपयुक्तता सगळ्यांच्या लक्षात आली असून त्यांच्या या कृतीचं अनेक लोकप्रतिनिधींकडून अनुकरण केलं जातं आहे.

Updated : 2 April 2020 9:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top