Home > News Update > #कोरोनाशी_लढा - लोकल फेऱ्या वाढणार

#कोरोनाशी_लढा - लोकल फेऱ्या वाढणार

#कोरोनाशी_लढा - लोकल फेऱ्या वाढणार
X

मुंबईत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने लोकल वाहतूक खुली केली. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या.

आता पश्चिम रेल्वेने या फेऱ्यांमध्ये आणखी 40 नवीन फेऱ्यांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन फेऱ्या आजपासून सुरू होत आहेत. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावर 162 ऐवजी 202 लोकल फेऱ्या सुरू होतील. यामध्ये बोरिवली ते चर्चगेट अप आणि डाऊन मार्गावर 20 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

हे ही वाचा..

राज्यात ८६ हजार ५७५ रुग्णांनी केली कोरोनावर मात, ‘या’ भागात सर्वांधिक कोव्हिड योद्धे

30 जून नंतर लॉकडाऊन उठणार नाही: उद्धव ठाकरे

लोकलमधून केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी

तर बोरिवली ते बोईसर दरम्यान डाऊन मार्गावर दोन लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. बोईसर-चर्चगेट दरम्यान अप मार्गावर 2 लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या असून विरार-बोरिवली मार्गावर 2 स्लो लोकल वाढवण्यात आल्या आहेत.

तर विरार- चर्चगेट दरम्यान 14 फेऱ्या वाढवण्यात आल्या असून डाऊन दिशेला 8 तर अप दिशेला 6 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

Updated : 29 Jun 2020 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top