Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

19

भारत सरकार ने Unlock 1 ची घोषणा केल्यानंतर आता राज्यसरकारने देखील नियम शिथील करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता जनजीवन सुरु करण्यात येणार आहे.  राज्यातील धार्मिक स्थळ, हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंट बंदच राहणार आहे. राज्यातील सामूहिक कार्यक्रमांवर बंदी ठेवण्यात येणार आहे. तसंच कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे.

या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला
‘महाराष्ट्राला काही जण आपलीच मंडळी बदनाम करत आहे’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मिशन बिगीन अगेन म्हणजे पुनश्च हरीओम, लॉकडाऊन हे विज्ञान असेल, तर ते उघडणं ही कला आहे, पावसाळा तोंडावर असल्याने काळजी घ्यावी लागेल.

पावसाळ्याची सुरुवात म्हटल्यावर मी सर्वांची बैठक घेतली, त्यात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे, मात्र अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली तरीही आपण सज्ज आहोत.

येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता, आपली यंत्रणा सज्ज, पुढील चार दिवस मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये.

मास्क लावणे अनिवार्य, कुठेही हात लावल्यानंतर चेहऱ्याला न लावणे, हे पुढील आयुष्यात लक्षात ठेवा.

इतर देशांप्रमाणे आपल्याला उघडझाप करायची नाही, आपण एकदा उघडलेली गोष्ट बंद करायची नाही.

ज्या ठिकाणी गर्दी होईल त्याला परवानगी नाही. एकमेकांपासून अंतर ठेवू तेवढंच कोरोनापासून अंतर राहिल, नातेवाईक भेटले तरी नमस्कार करा.

बाहेर फिरताना जितके अंतर ठेऊ, तितकेच कोरोनापासून अंतर ठेवा, मित्र-आप्तेष्ट यांना भेटा, पण अंतर राखून नमस्कार करा, तीन तारखेपासून घराबाहेर व्यायाम करण्यास मुभा.

पाच जूनपासून दुकाने एकआड एक दिवस सुरु करणार, तर आठ तारखेपासून कार्यालये सुरु करणार, कर्मचारीसंख्या 10 टक्के उपस्थितीने सुरु करणार.

महाराष्ट्र किती शिस्तबद्ध आहे, याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.

५५ ते ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच मधुमेह, हृदयविकार, ब्लड प्रेशर असे आजार असलेल्या व्यक्तीनी घराबाहेर पडू नये.

ज्यांना आवश्यक नाही खासकरुन जे वयोवृद्ध आहेत. त्यांनी बाहेर पडू नका. वयोवृद्धांनी बाहेर पडू नका.

युवा वर्गाने आपल्याकडून इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, स्वच्छ अंघोळ करुन काही अंतर राखावे.

जे कोणी घराबाहेर पडणार आहेत, त्यांनी घरात येताना काळजी घ्या, त्याचा संसर्ग होईल असे होऊ नये. घराबाहेरुन आल्यानंतर हातपाय धुवा, अंघोळ करा.

सरकारला-जनतेला एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं आहे.

एकूण ६५ हजार रुग्ण, २८ हजारच्या आसपास रुग्ण बरे, ३४ हजार रुग्ण अॅक्टिव्ह, २४ हजार रुग्णांना लक्षणेही नाहीत, साडेनऊ हजार मध्यम ते तीव्र लक्षणे, दोनशे रुग्ण व्हेंटीलेटरवर.

महाराष्ट्राला काही जण आपलीच मंडळी बदनाम करत आहे.

Comments