Home > News Update > पूर्णा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पूर्णा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पूर्णा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
X

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील काही भागात कालपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून दमदार पडणाऱ्या या पावसामुळे नद्या-नाले व ओढ्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने सेनगांव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या व येलदरी धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सेनगांवचे तहसीलदार आदित्य बोथीकर यांनी केले आहे.

मागच्या आठवड्यात तालुक्यात दमदार पावसाने काही ठिकाणी शेतात पाणी शिरुन शेतीचे अतोनात नुकसान झाले होते व काही ठिकाणी जीवितहानी सुद्धा झाली होती त्यामुळे सध्या पाऊस कोसळत असून नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने पूर्णा नदी काठच्या नागरिकांनी दक्षता घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार आदित्य बोथीकर यांनी केले आहे.

दरम्यान जोरदार पावसामुळे काही आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे बोथीकर यांनी सांगितले.

Updated : 14 Sep 2021 12:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top