Home > News Update > 'कॅबच्या' विरोधात आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा

'कॅबच्या' विरोधात आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा

कॅबच्या विरोधात आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा
X

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील काही विद्यार्थी संघटनांनी आज कॅबच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी मागीतली होती. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली असता, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्यप्रवेशद्वारावर येऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलन करण्याऱ्या विद्यार्थ्यांना विरोध केला असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

पोलिसांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांना नोटीस बजावल्या आहेत. त्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार आणि समोरील रस्त्यावर एनआरसी, 'सीएबी' आणि 'एनपीआर' या कायद्याविरोधात तीन कायदे पास केल्याचं सांगितले आहे. तसचं वरील ठिकाणी रस्ता रोको, खासगी अथवा शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पुतळा, पोस्टर जाळणे, जोडे मारणे, एखाद्या देशाचा झेंडा जाळणे अशी कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Updated : 17 Dec 2019 9:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top