Home > News Update > कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर मुलीचं जल्लोषात स्वागत...

कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर मुलीचं जल्लोषात स्वागत...

राज्यात कुठेही कोणाच्याही घरी मुलगी झाली की, आजही तीच्याकडे नकुशी म्हणून पाहिले जाते. मात्र औरंगाबाद शहरातील झोड कुटुंबीयांना कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मुलीचं जल्लोषात स्वागत केले.

कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर मुलीचं जल्लोषात स्वागत...
X

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आजही मानव प्रगती करत असताना, वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा असतो. यामुळे अनेक ठिकाणी स्त्री भ्रूहत्या झाल्याच्या घटना उघडकीस येतात. मात्र औरंगाबाद शहरातील झोड कुटुंबीयांना कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मुलीचं जल्लोषात स्वागत केले. सोबत गावातील तीस मुलींचे टपाल कार्यालयात सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडून दिले.

मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील गोळेगावचे प्रवीण झोड आणि प्रवीण धोंडे औरंगाबाद शहरातील टी पॉइंट परिसरातील म्हसोबा नगर येथे राहतात. सध्या ते टपाल कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. तर त्यांच्या पत्नी विद्या या शाळमध्ये शिक्षिका आहेत. झोड कुटुंबीयांना पहिला मुलगा आहे . त्यानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आजही समाज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करत असताना मुलगी झाल्यानंतर नकारात्मक विचार किंवा वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा असा हट्ट धरला जातो. असे प्रवीण यांनी सांगितले.

दैनिकांमध्ये आणि बातम्यांमध्ये स्त्रीभ्रूण हत्या सारख्या घटना दररोज छापून येत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विकास करत असलेला माणूस माणुसकी आणि विश्वास गमावत चाललाय का? असा प्रश्न पडतो. त्यामुळे मानवांमध्ये निर्माण झालेली ही नकारात्मकता दूर करण्याचा उद्देश समोर ठेवून आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर आम्ही तिचं जल्लोष स्वागत केले. त्यासोबतच गावातील 30 मुलींचं सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडून दिले.

ग्रामीण भागामध्ये शासकीय योजनांच्या संदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे. अनेक जण टपाल कार्यालयाची सुकन्या समृद्धी योजना लाभ घेत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवून आम्ही गावातील पदाधिकारी व यंत्रांच्या माध्यमातून दवंडी घेऊन मुलींची माहिती मागवली. त्यानंतर आमच्याकडे 30 मुलींची कागदपत्र जमा झाली आणि त्या दिवशी ३० मुलींची सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडून दिली.

मुलगा एकाच घरासाठी प्रकाश देतो. मात्र मुली या दोन्ही घरांमध्ये प्रकाश देत असतात. मग यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत जंगी व्हावे, यासाठी आम्ही जल्लोषात स्वागत केले. त्यासोबतच अनावश्यक खर्च करण्यापेक्षा आम्ही गावातील 30 मुलींचे खाते उघडून दिले. मला मुलगी झाली याचा मला खूप आनंद झाला. मुलीचे नाव जिजा ठेवले आहे. मुलीला शिकवून मोठं करणार आहे. त्यासोबतच समाजामध्ये मुलींच्या बाबतीत असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे झोड कुटुंबियांनी सांगितले.

Updated : 28 Jan 2023 10:13 AM GMT
Next Story
Share it
Top