Home > News Update > मिसळी सोबत ब्रेड हवा की पाव ?

मिसळी सोबत ब्रेड हवा की पाव ?

मिसळी सोबत ब्रेड हवा की पाव ?
X

CAA आणि NCR कायद्यावरुन देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या कायद्याविरोधात देशव्यापी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झालाय. अनेकजण अटकेत आहेत. सर्व माध्यमांवर यावरुनच चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे मात्र जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने हा गंभीर विषय सोडून चर्चेला वेगळाच विषय हातात घेतला. “मिसळी सोबत ब्रेड हवा की पाव ?” या विषयावर या चॅनेलमध्ये तासभर चर्चा झाली. सोशल माध्यमांवर ही चर्चा आता टीकेचा आणि मनोरंजनाचा विषय़ ठरली असून अनेक नेटकऱ्यांनी यावर आपला संताप व्यक्त केलाय.

जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलने गुरुवारी मिसळी सोबत ब्रेड हवा की पाव? या विषयावर १ तास पॅनेल चर्चा केली. कोल्हापूर, नाशिक, पुण्यातले मिसळप्रेमी, शेफ आणि खवय्यांना या चर्चेत बोलावण्यात आलं होतं. संपादकांना कुठलाही विषय न मिळाल्यामुळे हा विषय घेण्यात आला की काय या स्वरुपाच्या प्रतिक्रीया समाजमाध्यमांवर उमटायला सुरुवात झाली आहे. काही ज्येष्ठ संपादकांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांनी तर आपण हजारांहून जास्त शो केले, मात्र एवढ्या गंभीर विषयावर चर्चा केली नसल्याची उपहासात्मक प्रतिक्रिया दिली.

जय महाराष्ट्रवरचा हा डिबेट शो सध्या फेसबूक,ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहे. टेरीबल मराठी टेल्स या ट्विटर अकाऊंटवर ट्विटर यूजर्स मनोरंजक प्रतिक्रिया लिहित आहेत.

Updated : 27 Dec 2019 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top