वाधवान कुटुंबाची परिस्थिती ‘आस्मान से गिरे खजूर पे अटके’

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असं  असताना देखील महाराष्ट्र सरकारच्या गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने नियम धाब्यावर बसवत गुप्त पणे वाधवान कुटुंबाला मंत्रालयातून विशेष परवानगीचं पत्र दिलं. मुंबईतले मोठे उद्योजक असलेले वाधवान या पत्राने आपल्या परिवारासह गुरूवारी महाबळेश्वरमध्ये पोहोचले.

पण महाबळेश्वरमधल्या नागरिकांनी त्यांना आत येण्यास विरोध केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पाचगणीमध्ये विलगीकरणात ठेवले आहे. जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून हे उद्योजक २३ जणांसह मोकळ्या हवेत फिरण्यासाठी खंडाळ्याहून महाबळेश्वरला पोहोचले होते. ५ गाड्यांमधून हे वाधवा कुटूंब महाबळेश्वरला पोहोचले. JH05-BP 0021,JH05-0016, MH02-DW4179, MH02-DZ7801 या पाच गाड्यांमधून हे लोक आपल्या स्टाफसह पोहोचले.

लॉकडाउनचा आणि संचारबंदीचा आदेश धाब्यावर बसवल्यामुळे वाधवान कुटुंबावर जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कारवाई केली असताना आता सीबीआय ने वाधवान कुटुंबियांना कुठेही जाऊ देऊ नका. असं पत्र सीबीआय ने सातारा पोलिसांना पाठवलं आहे. सध्या वाधवान कुटुंबियांना पाचगणी च्या सेंटझेव्हिअर्स स्कुलमध्ये क्वारंन्टाईन करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या 5 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळं मोकळी हवा खाण्यासाठी खंडाळ्याहून महाबळेश्वरला निघालेले वाधवान कुटूंबाला आता शाळेत जाऊन बसण्याची वेळ आली आहे.

एकंदरीत वाधवान कुटुंबाची परिस्थिती ‘आस्मान से गिरे खजूर पे अटके’ अशी झाली आहे.