सिलमपूरमध्ये हिंसक आंदोलन, वाहन जाळली

NRC Protest

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला देश भरात विरोध होत आहे. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं, कॅब विरोधात आंदोलनं दिवसेंदिवस वाढत आहेत. सिलमपूर भागात आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्यानं पोलिसांना या बचावासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला. त्यानंतर तब्बल दोन तांसानी परिसर शांत असताना देखील आंदोलकांनी दोन दुचाकी जाळून पोलीस चौकी पेटवून दिली.

हे ही वाचा…

पालघर जिल्हा परिषदेसाठी  7 जानेवारीला मतदान
एका मोठ्या पर्वाचा अंत झाला – अमोल पालेकर
सावरकरांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे विचार तुम्ही वाचलेत का?

शांततेच्या पद्धतीने मोर्चा सुरु असताना गर्दितून पोलिसांवर दगडफेक झाली. तेथील आंदोलकांनी पोलिसांना मारहण सुरु केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधाराचा वापर केला. या सर्व आंदोलन करणाऱ्यांवर गस्त घालण्यासाठी ड्रोनच्या साहाय्याने लक्ष ठेऊन ताब्यात घेतलं.