Home > News Update > दिल्लीमध्ये दुसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरुच

दिल्लीमध्ये दुसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरुच

दिल्लीमध्ये दुसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरुच
X

सुधारीत नागरिकत्व कायदा आणि एनआरसी कायद्यावरुन दुसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरुचं आहे. महत्वाचं म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दिल्लीत संध्याकाळी दाखल होताहेत. दुपारी CAA आणि NRC कायद्याचे विरोधक आणि समर्थक आमनेसामने आल्यानं पुन्हा हिंसाचार भडकला. यामध्ये गोकुळपुरी पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यु झाला.तर शाहदरा भागाचे डिसीपी अमित शर्मा हे या हिसांचारात गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर दिल्लीतल्या मॅक्स हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे.

समर्थक आणि विरोधकांमध्ये गोळीबार सुरु आहे. आंदोलकांनी तीन वाहन पेटवलीत. जाफराबादमध्ये दोन्ही गटामध्ये तुफान दगडफेक सुरु आहे. आजूबाजूच्या दुकानांना आगी लावण्याचा प्रयत्नही आंदोलक करताहेत. यामध्ये एका तरुणाच्या पायाला तर एका पोलिस कर्मचाऱ्याला गोळी लागली आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनीधींनाही आंदोलकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा...

दिल्लीतली परिस्थिती बघता उपराज्यपाल अनिल बैजल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची विनंती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलीये. दिल्लीची शांतता भंग करण्याचा कुणालाही अधिकार नाही,असही ते म्हणाले.

दरम्यान मौजपुर परिसरातही दोन्ही गटामध्ये हिसांचार सुरु आहे. या हिंसाचारात दोन पोलिस आणि १५ जण जखमी झालेत. दिल्ली पोलिसांनी मौजपुरकडे जाणारे रस्ते बंद केलेत. आंदोलक एकमेकांवर दगडफेक करताहेत. आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान पोलिसांनी खबरदारी म्हणून जाफराबाद आणि मौजपुर-बाबरपुर मेट्रो स्टेशन तात्पुरते बंद केलेत. या स्टेशनमध्ये मेट्रो थांबणार नाही अस दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशने स्पष्ट केलंय.

Updated : 24 Feb 2020 11:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top