विकास दुबेचा खात्मा पण अनेक प्रश्न जिवंत!

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये आठ पोलिसांचा जीव घेणाऱ्या विकास दुबे याला अखेर पोलिसांनी एन्काऊंटर मध्ये ठार केलेले आहे. विकास दुबे याने मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पोलिसांपुढे गुरुवारी शरणागती पत्करली होती. त्यानंतर रात्री उशिरा उज्जैनमधून उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक त्याला कानपूरसाठी घेऊन निघाले होते. पण कानपूरच्या जवळ आल्यानंतर पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातानंतर विकास दुबने पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. पळून जात असताना त्याने पोलिसाची बंदुकदेखील हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला.

प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विकास दुबे ठार झाला असा दावा पोलिसांनी केला आहे. विकास दुबेला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आठ पोलिसांचा जीव घेणाऱ्या विकास दुबेला पोलिसांनी ठार तर केले. पण यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झालेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी काल एक ट्विट केलं होतं…

ट्विट मध्ये त्यांनी एका माजी आयपीएस अधिकाऱ्यांचा हवाला देत असं म्हटलं होतं की, विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांचा एन्काऊंटर केले जाण्याची शक्यता आहे कारण विकास दुबेला अनेक मोठ्या नेत्यांची गुपित माहित आहेत. त्यामुळे विकास दुबेच्या अटकेतून कुणाला त्रास होऊ शकला असता कोण अडचणीत येऊ शकलं असतं हे प्रश्न आता अनुत्तरितच राहिलेली आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here