#MaharashtraBandh: सीएए विरोधात सुजात आंबेडकर रस्त्यावर

वंचित बहुजन आघाडी (VBA) च्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद ला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दांडेकर पुल परिसरात दुकाने बंद करण्यात आली होती प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी स्वत: आंदोलनाचं नेतृत्व करत रास्ता रोको केलं. देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणि CAA विरोधात नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही सुजात यांनी केलं होतं.

आज पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मागे (Maharashtra Bandh) देशाच्या ढासळत्या आर्थिक व्यवस्थेचा निषेध करणं हे मुख्य कारण असुन केंद्र सरकार शासकीय योजना, सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणूकीची धोरण राबवतंय त्याचा विरोध करणं आहे असं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं.

“देशातील वाढती बेरोजगारी, गरिबी या खुप मोठ्या समस्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारी क्षेत्रातुन निर्गुंतवणुक करत असाल तर देशाची आर्थिक समस्या अजुनच वाढणार आहे. आर्थिक मंदीचा फटकाही मोठ्या प्रमाणात बसणार आहे.” असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

सीएए आणि एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईत या बंदचा परिणाम फारसा जाणवलेला नाही. चेंबुर, घाटकोपर आणि ठाण्याच्या काही भागात वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक मंदावली होती. पण पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली. चेंबूरमध्ये या बंदला हिंसक वळण लागलं. इथं एका बसची काच फोडण्यात आली. पण या व्यतिरिक्त मुंबईत बंदचा परिणाम दिसत नाहीये.

शाळांना या बंदमधून वगळण्यात आल्यानं सर्व ठिकाणी शाळा सुरू आहेत. त्याचबरोबर मुंबई आणि ठाण्यात सर्व व्यवहार सुरळीत आहे. राज्यात परभणी, हिंगोली, मनमाड, अकोला इथे मात्र कडक़ीत बंद पाळण्यात येतोय. अमरावतीमध्ये बदला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांनी लाठीमार केलाय.

Maharashtra Bandh: सीएए विरोधात सुजात आंबेडकर रस्त्यावर

Maharashtra Bandh: सीएए विरोधात सुजात आंबेडकर रस्त्यावर#MaxMaharashtra

Posted by Max Maharashtra on Friday, January 24, 2020