Home > News Update > प्रकाश आंबेडकर करणार लॉकडाऊन च्या विरोधात ‘डफली बजाव’ आंदोलन

प्रकाश आंबेडकर करणार लॉकडाऊन च्या विरोधात ‘डफली बजाव’ आंदोलन

प्रकाश आंबेडकर करणार लॉकडाऊन च्या विरोधात ‘डफली बजाव’ आंदोलन
X

केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत. याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याचं पाहिजे. या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

हे ही वाचा...

महाराष्ट्र सायबर मध्ये इंटर्नशीप करण्याची सुवर्ण संधी…

Covid रुग्णाचं समुपदेशन करणारा शौकतअली

Fact Check: महाराष्ट्रात भाजपचे 12 हून अधिक आमदार फुटणार?

हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार या संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन त्यांनी केलंय. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगावे शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे?, हेही समजावून सांगावे असे ही प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी सांगितले.

Updated : 10 Aug 2020 1:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top