कोरोनावरील देशातील पहिली लस, किती हॉस्पिटल्समध्ये होणार मानवी चाचणी?

Courtesy: Social Media

कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे ICMR आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (BBIL) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी राजेश टोपे यांनी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारपणे महत्त्वाच्या १३ ते १४ हॉस्पिटल्समध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

७ जुलैपर्यंत ह्या क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनीकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगितल्याची राजेश टोपे यांनी दिली. “याबाबत मी आशादायी असून सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल” असेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले.

हे ही वाचा…

दरम्यान या लसीच्या चाचण्या लवकरात पूर्ण करुन १५ ऑगस्टपर्यंत लस तयार करण्याचे लक्ष्य ICMRने ठेवलेल आहे. त्यासंदर्भात ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी सर्व संबंधित विभागांना तसे पत्रही पाठवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here