सोशल मीडियावर नियंत्रणासाठी ट्रम्प यांचा मोठा निर्णय

22

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मन्सना देण्यात आलेले कायदेशीर संरक्षण कमी करण्यासाठी सरकारच्या अधिकारांमध्ये वाढ करणाऱ्या एका अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. या अधिसूचनेमुळे आता फेसबुक, ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्मविरोधात सरकारला कायदेशीर कारवाई करता येणार आहे.

“अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला निर्माण झालेल्या मोठ्या धोक्यापासून संरक्षण कऱण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.” असे ट्रम्प यांनी या अधिसूचनेवर स्वाक्षरी करताना म्हटले आहे.

2 दिवसांपूर्वी ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन ट्विट हे गैरसमज पसरवणारे असल्याचे लेबल त्यांच्या ट्विटला लावल्याने ट्रम्प यांचा भडका उडाला आहे. यावर ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाला कायदेशीर आव्हान मिळणार असल्याची खात्री असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Comments