Home > News Update > भारत - चीन संघर्षावर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया

भारत - चीन संघर्षावर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया

भारत - चीन संघर्षावर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया
X

भारत आणि चीनच्या सीमेवर गलवाण खोऱ्यात १५ जूनला झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे ४३ सैनिक मारले गेले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान अमेरिकेने यावर प्रतिक्रिया देताना, "भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सैन्य मागे घेण्याच्या आणि शांततेने तोडगा काढण्याच्या दोन्ही बाजूंच्या भूमिकेला पाठिंबा देतोय.

या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत", असेही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात २ जून रोजी झालेल्या चर्चेतही भारत-चीन वादावर चर्चा झाली होती, अशीही माहिती या प्रवक्त्यांनी दिली आहे.

याआधी ट्रम्प यांनी भारत आणि चीन दरम्यानच्या वादात मध्यस्थ म्हणून काम करण्याची तयारी दाखवली होती. पण दोन्ही देशांनी अमेरिकच्या या भूमिकेला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.

Updated : 17 Jun 2020 1:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top