अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या ४२ हजारांच्यावर

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या आता ७ लाख ८४ हजारांवर पोहोचली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील कोरोनाबळींच्या संख्या आता ४२ हजार ९४वर पोहोचली आहे. सोमवारी एका दिवसात कोरोनाबळींची संख्या १ हजार २११ ने वाढली आहे. पण रविवारच्या तुलनेत मृतांची संख्या सुमारे ७०० ने कमी झाली आहे.

त्याचबरोबर ७२ हजारांच्यावर रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला बसला आहे. इथे कोरोनाचे २ लाख ४७ हजार ५१२ रुग्ण आहे तर मृतांची संख्या १४ हजार ३४७वर पोहोचली आहे.