मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी

संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे.या अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संध्याकाळी बोलावलेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. केंद्रात मोदी सरकारला घेरण्यासाठी कोणती रणनीती आखता येईल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत चर्चा करण्यात आली. आता बुधवारी सकाळी पुन्हा यूपीएची बैठक बोलावली असून, त्यावेळी सर्वपक्षीय बैठकीत जाण्याबाबत निर्णय होणार आहे.आज झालेल्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, डीएमके नेत्या कनिमोझी, सीपीआय नेते डी. राजा आणि नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.