ड्रायव्हिंग लायसन्स, PUC ची मुदत संपली? काळजी करु नका !

सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर वाहनांच्या कागदपत्रांच्या नुतनीकरणाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. पण आता ड्रायव्हिंग लायसन्स, पीयूसी, विमा, तसंच नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना सरकारने तसे आदेश जारी केले आहेत. कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर असल्याने लोकांना गाड्यांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी अडचणी येत आहेत, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. १ फेब्रुवारी नंतर नुतनीकरणाची गरज असलेल्या वाहनांना ही सवलत असेल.