Home > News Update > अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ठाकरे सरकारला धक्का

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ठाकरे सरकारला धक्का

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ठाकरे सरकारला धक्का
X

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील विद्यापीठांच्या सर्व विषयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. पण आता केंद्रीय गृहमंत्रालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात असं पत्र जारी केलेलं आहे.

विद्यापीठांनी यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन परीक्षा घ्याव्यात असं केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. विद्यापीठांनी यूजीसीची मार्गदर्शक तत्व तसंच विद्यापीठांचे शैक्षणिक वेळापत्रक आणि केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या SOP प्रमाणे परीक्षा घ्याव्यात असे या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेतला होता.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकतं तसंच भविष्यात त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येऊ शकतात असे मुद्दे देखील मांडले गेले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा मुद्दा मांडत या परीक्षा रद्द केल्या होत्या. तसेच विद्यापीठांनी अंतर्गत मूल्यांकनात द्वारे विद्यार्थ्यांचे निकाल द्यावेत असंही सांगितलं गेलं होतं. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाऐवजी परीक्षा देण्याची इच्छा असेल त्यांना तशी मुभाही सरकारने दिली होती. पण आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसलेला आहे.

Updated : 7 July 2020 1:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top