Home > News Update > शैक्षणिक शुल्कवाढीच्या विरोधात FTII च्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण

शैक्षणिक शुल्कवाढीच्या विरोधात FTII च्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण

शैक्षणिक शुल्कवाढीच्या विरोधात FTII च्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण
X

पुण्यातील एफटीआयआयच्या (FTII) विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. २०१३ पासून शैक्षणिक शुल्कात प्रत्येक वर्षी १० टक्के वाढ केली जात आहे. याशिवाय २०१५ पासून प्रवेश शुल्कातही वाढ केली गेली. वाढ कमी करण्यात यावी या मागणीसाठी एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे.

२०१३ पासून प्रत्येक वर्षी शैक्षणिक शुल्कात १० टक्के वाढ केली गेली. त्यामुळे २०१३ मध्ये जे शैक्षणिक शुल्क ५५ हजार ३८० होतं. २०२० मध्ये ते शैक्षणीक शुल्क १ लाख १८ हजार ३२३ रुपयांपर्यंत पोहोचलं. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कामध्येही २०१५ पासून वाढ केली जात आहे.

२०१५ मध्ये प्रवेश शुल्क १५०० रुपये होतं. ते आज 10 हजारांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा शुल्कवाढीचा भार सहन करावा लागतोय. मागील तीन वर्षांपासून सतत ही बाब एफटीआयआय प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष गेल जात असल्याचं या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत प्रवेशशुल्क कमी होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबवावी अन्यथा उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Updated : 17 Dec 2019 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top