Home > News Update > ‘व्यंगनगरी’ मूक झाली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘व्यंगनगरी’ मूक झाली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘व्यंगनगरी’ मूक झाली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
X

ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे. या क्षणाला ठाकरे कुटुंबातील एक सदस्य कायमचा दूर गेल्याचे दु:ख मनात आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, विकास सबनीस यांनी कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी राजकीय परिस्थितीवर अचूक भाष्य करीत त्यांनी अनेकांना घायाळ केले. ‘मार्मिक’शी त्यांचे विशेष ऋणानुबंध होते. व्यंगचित्रामागे असलेला विचार ही त्यांची विशेष ओळख होती. रेषांच्या सहाय्याने राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्याच्या परिणामांचा विचारही त्या व्यंगचित्रामागे असे.

हे ही वाचा...

मुंबईतील विकासकामांचा प्राण्यांना फटका

वर्षा बंगल्यात उद्धव ठाकरें विरोधात लिखाण

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने दिलेल्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक

बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्मण अशा महान व्यंगचित्रकारांकडून प्रेरणा घेऊन या दोघांचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या निधनाने 50 वर्षे कलेची सेवा करणारा निष्ठावंत कला उपासक हरपला आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विकास सबनिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

Updated : 28 Dec 2019 11:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top