Home > News Update > उदयनराजे-संजय राऊत वाद; शिव प्रतिष्ठानने केलं सांगली बंदच आवाहन..

उदयनराजे-संजय राऊत वाद; शिव प्रतिष्ठानने केलं सांगली बंदच आवाहन..

उदयनराजे-संजय राऊत वाद; शिव प्रतिष्ठानने केलं सांगली बंदच आवाहन..
X

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होत. या विधानाचा निषेध कऱण्यासाठी शिव प्रतिष्ठानने शुक्रवारी सांगली जिल्हा बंदच आवाहन केलंय.

संबंधित बातम्या...

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) शुक्रवारी पहिल्यांदाच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वाळवा तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनोहर भिडे यांच्या सांगली जिल्हा बंदचा काय परिणाम होणार यावर सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

दरम्यान भिडे गुरुजी यांनी वादग्रस्त पुस्तकावर सोयीस्कर भूमिका घेत, काहीच प्रतिक्रीया दिली नाही. मात्र संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध कऱण्यासाठी बंदची घोषणा केली, अशी टिका संभाजी ब्रिगेडने केलीये. त्यामुळे जर भिडेंना छत्रपतींबद्दल आदर असेल तर जयभगवान गोयल यांच्या पुस्तकाचा निषेध करावा असा सल्ला संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष सुयोग्य औंधकर यांनी दिलाय. दरम्यान संजय राऊत यांचा बचाव करतांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते, कॅबीनेट मंत्री नवाब मलिक यांनी उदयन राजेंना जर कोणी पुरावे मागत असतील तर त्यांनी ते दिले पाहिजे. तंगडी तोडण्याची भाषा कोणीही करु नये. अनेक राजघराण्यांमध्ये दत्तक घेतलेले राजे आहेत असा टोलाही मलिक यांनी लगावला.

छत्रपतींच्या वंशजांची ढाल करून समाजात तेढ कशी निर्माण होईल, लोकांची डोकी कशी फुटतील एवढंच भिडे पाहतात. त्यामुळे शिवप्रेमींनी मनोहर भिडे (Manohar Bhide) यांच्यावर दुर्लक्ष कराव असं आवाहनही औधंकर यांनी केलयं.

Updated : 16 Jan 2020 5:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top