Home > News Update > बारावीला ‘संविधान मूल्य जागृती अभ्यासक्रम’ अनिवार्य करावा

बारावीला ‘संविधान मूल्य जागृती अभ्यासक्रम’ अनिवार्य करावा

बारावीला ‘संविधान मूल्य जागृती अभ्यासक्रम’ अनिवार्य करावा
X

महाराष्ट्रातील साहित्य शिक्षण कला संस्कृती तसेच सामाजिक कार्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांनी इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात ‘संविधान मूल्य जनजागृती’ चा समावेश करावा. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.

विद्यमान सरकार ज्या महापुरुषांचे विचार आणि त्यांच्या विचारांचा वारसा सांगत निवडून आलेले आहे. त्या महापुरुषांचा सार भारतीय संविधानामध्ये असून त्यातील मूल्ये शालेय शिक्षणात समाविष्ट करावीत. हे काम प्रभावीपणे होण्याकरीता शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि हा विषय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विषय पत्रिकेवर घ्यावी. अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या तज्ञांमध्ये डॉ रावसाहेब कसबे, डॉ गणेश देवी, राम पूनियानी, लोकशाहीर संभाजी भगत यशवंत मनोहर, हेरंब कुलकर्णी, संजय आवटे, प्रेमानंद गज्वी यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे.

Updated : 12 July 2020 4:34 PM GMT
Next Story
Share it
Top