Home > News Update > उ. कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आहे कुठे?

उ. कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आहे कुठे?

उ. कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आहे कुठे?
X

आपल्याभोवती कायम एक गूढ वलय घेऊन जगणारा उ.कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनबाबत सध्या एक मोठे गूढ निर्माण झाले आहे. जगभरातील विविध माध्यमांमध्ये किम जोंग उन सध्या कुठे आहे याची चर्चा सुरू आहे. किम जोंग उन यांच्या ह्रदयाचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण ते नेमके कुठे आहेत, त्यांची प्रकृती खऱंच गंभीर आहे का याबाबत उ.कोरियाकडून कोणतीही माहिती दिली जात नाहीये.

दरम्यान चीनमधून डॉक्टरांचे एक पथक उ.कोरियाला रवाना झाल्याचे वृत्त आल्याने हे गूढ आणखीनच वाढले आहे. उ.कोरियाचे संस्थापक आणि त्यांचे आजोबा किम इल संग यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला किम जोंग अनुपस्थित राहिले आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी उलससुलट चर्चा सुरू झाली. पण याविषयी उत्तर कोरियाकडून कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.

दरम्यान किम जोंग उननंतर त्यांची वारसदार म्हणून त्यांची बहिण किम यो जाँग ही उ. कोरियाची हुकूमशाह होईल अशीही चर्चा सुरू झाली. पण यासगळ्या उ.कोरियाकडून काहीही सांगितले जात नाहीये. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्य़ डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी किम जोंग उन खूप आजारी आहे असे आपल्याला वाटत नाही असे वक्तव्य केल्याने किम यांच्या अचानक अदृश्य होण्याचे गूढ वाढले.

दरम्यान किम जोंग उन यांच्यासाठी असेलली एक विशेष रेल्वे वोन्सान इथं स्टेशनमध्ये उभी असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. अमेरिकेच्या उपग्रहांने या रेल्वेचे फोटो काढले आहेत. पण यामुळे किम जोंग इथं असतीलच असे नाही असंही अमेरिकेचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अमेरिकन गुप्तचरांच्या माहितीप्रमाणे उ.कोरियात कोणतीही लष्करी हालचाल दिसत नाहीये, पण सध्या अमेरिका बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे किम जोंग उन नेमके आहेत कुठे असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

Updated : 26 April 2020 9:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top