Home > News Update > लॉकडाऊननंतर गोव्याला जायचा विचार आहे? मग ही बातमी वाचाच!

लॉकडाऊननंतर गोव्याला जायचा विचार आहे? मग ही बातमी वाचाच!

लॉकडाऊननंतर गोव्याला जायचा विचार आहे? मग ही बातमी वाचाच!
X

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि संपूर्ण देश ठप्प झाला. नागरिकांच्या बाहेर पडण्यावर निर्बंध आले, जिल्हाबंदी करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा प्रसार कमी होत नसल्याने लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवले. या दरम्यान देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य ठरले ते म्हणजे गोवा...त्यामुळे गोवा पर्यटकांसाठी कधी खुले होईल असा प्रश्न विचारला जाऊ लागला. यावर गोव्याचे पर्यटन मंत्री मायकेल लोबो यांनी संपूर्ण देश कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत गोव्यात पर्यटन सुरू केले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. “भारतामधील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत गोव्यामध्ये पर्यटकांना परवानगी दिली जाणार नाही, कारण देशभरातून पर्यटक गोव्यात येत असतात आणि पुढचे किमान दोन महिने तरी काही होणार नाही” असे लोबो यांनी म्हटले आहे.

ल़ॉकडाऊनमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला असल्याचेही लोबो यांनी सांगितले. गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज काही महिन्यांपर्यंत माफ करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Updated : 23 April 2020 6:45 AM GMT
Next Story
Share it
Top