Home > News Update > अखेर छगन भुजबळ यांच्या आयुष्यातील सुवर्ण दिवस उजाडला

अखेर छगन भुजबळ यांच्या आयुष्यातील सुवर्ण दिवस उजाडला

अखेर छगन भुजबळ यांच्या आयुष्यातील सुवर्ण दिवस उजाडला
X

गेल्या काही दिवसापासून भुजबळ सेनेत जाणार का? या विषयी राजकीय चर्चा होत आहे. छगन भुजबळ शिवसेनेत जाणार की राहणार? याचा निर्णय अजुनही झाला नसला तरी छगन भुजबळ यांच्या जीवनातील सुवर्ण दिवस आज उजाडल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा :

येवला लासलगाव मतदारसंघात २००४ साली प्रतिनिधित्व केल्यानंतर येवल्याला पाणी आणण्याचे जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होत असून आज माझ्या आयुष्यातील हा एक सुवर्ण दिवस असल्याच्या भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केली. त्यांच्या हस्ते आज दरसवाडी धरण येथील कालव्यातून येवल्याच्या दिशेने पाणी प्रवाहित करण्यात आले. त्यावेळी भुजबळ बोलत होते.

हे ही वाचा

यावेळी भुजबळ म्हणाले की, गेल्या ४४ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कालव्याला पाण्याची प्रतीक्षा होती. यासाठी मांजरपाड्याचा प्रकल्प साकार करून पुणेगाव कालव्यातून पाणी दरसवाडी धरणात आले आणि आज या कालव्यातून पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहित झाले. माझ्या आयुष्यातील जे काही सुवर्ण क्षण आले. त्यातील आजचा हा दिवस माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे. येवला लासलगाव मतदार संघात निवडून आल्यानंतर येवल्याला पाणी आणण्याचे जे स्वप्न पाहिले आज अखेर पूर्ण झालं असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भुजबळ म्हणाले की, येवल्याला पाणी येणे शक्य नसल्याचं अनेकांनी सांगितले होतं. मात्र, अनेक प्रयत्न केल्यानंतर हे शक्य झाले आहे. त्यामुळे ज्यांना पाणी येईल असं वाटत नव्हतं. त्यांना जनतेनं सांगावे की, पाणी सुटले असं त्यांनी सांगितलं. मांजरपाड्याच्या पाण्याने पुणेगाव धरण पूर्णपणे भरून आज वाहत आहे. तसंच हे पाणी ओझरखेड नंतर पालखेड धरणाद्वारे पालखेड कालव्यातून निफाड आणि येवल्यात फिरत आहे. मांजरपाड्याच्या पाण्यामुळे दोन महिन्यांहून अधिक काळापासून पालखेड कालवा वाहत आहे. हे या प्रकल्पाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

Updated : 19 Sep 2019 3:59 PM GMT
Next Story
Share it
Top