Home > Max Political > वाघाने केली रानडुक्कराची शिकार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

वाघाने केली रानडुक्कराची शिकार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

वाघाने केली रानडुक्कराची शिकार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
X

मागील दोन दिवसांगोदार अमरावती जिल्ह्यातील पथ्रोड परिसरात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात भीतीच वातावरण असताना नुकतीच अचलपूर तालुक्यातील कामतवाडा परिसरात प्रकाश डिके यांच्या शेतात रानडुकरची शिकार केल्याने परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वनविभागाने पायाचे ठसे तपासले असता हा वाघच असावा असा अंदाज वर्तविला आहे.

सद्या विदर्भात सोयाबीन पीक काढणी सुरू असल्याने वाघाच्या दहशतीने शेतकरी चिंतेत आहे. आधीच परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला असताना हाती आलेलं पीक वाघाच्या दहशतीमुळे वाया जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे वाघाला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. तर कामतवाडा परिसरात हिंसक प्राणी असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाण्याचे टाळावे असे आव्हाहन केले आहे. तसेच वन विभागाकडून पत्रक काडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

Updated : 7 Nov 2019 1:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top