Home > News Update > 'टिकटॉक'ने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले ५ कोटी

'टिकटॉक'ने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले ५ कोटी

टिकटॉकने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले ५ कोटी
X

टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) कोविड विरुद्धच्या लढ्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रती सामाजिक दायित्वाची आम्हाला जाणीव आहे असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

टिकटॉक आपल्या युजर्सपर्यंत कोरोनासंबंधी माहिती पोहचवून जनजागृतीचं काम करत आहे. कोरोना विरुद्धच्या युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशनची सुविधा उपलब्ध केली असून या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात येत असल्याचं गांधी यांनी सांगितलं.

यासोबतच महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृह विभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Updated : 28 April 2020 10:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top