Home > News Update > जळगाव: 'त्या' घटनेप्रकरणी डीन भास्कर खैरे यांच्यासह तीन जण निलंबीत

जळगाव: 'त्या' घटनेप्रकरणी डीन भास्कर खैरे यांच्यासह तीन जण निलंबीत

जळगाव: त्या घटनेप्रकरणी डीन भास्कर खैरे यांच्यासह तीन जण निलंबीत
X

जळगाव कोव्हिड रुग्णालयात बाधीत महिलेचा मृतदेह आठ दिवस बाथरूममध्येच पडून असल्याच्या प्रकरणी अखेर शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉ भास्कर खैरे यांच्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आलं आहे.

जळगाव कोव्हिड रुग्णालयातील 82 वर्षीय बाधीत वृद्ध महिला बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. सदर महिला कोव्हिड वार्डच्या बाथरूम मध्ये आठ दिवसानंतर मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. जळगाव कोव्हिड रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता.

याप्रकरणी देशभर जळगाव प्रशासन तसंच आरोग्य यंत्रणेवर संतापाची लाट निर्माण झाली होती. आज अखेर शासकीय महाविद्यालयाचे डीन भास्कर खैरे यांच्यासह पाच जणांना वर निलंबनाची कारवाही करण्यात आली.

भाजप आमदार, महापौर विरुद्ध गुन्हा दाखल.

आठ दिवस बाधीत बेपत्ता महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळल्याने कोव्हिड रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध भाजप ने रुग्णालयासमोर आंदोलन केले होते. या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश भोळे, महापौर भरती सोनवणे यांच्या सह 22 जणांवर जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज पुन्हा 130 नवे कोरोना बाधीत रुग्ण!

जळगाव जिल्ह्यात आज आणखीन नवीन 130 कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1526 इतकी झाली आहे. तर 120 जनांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सतत शंभर च्या वरती कोरोना बाधीत रुग्ण आढळत आहे. तीन दिवसात 362 रुग्णांची भर पडली आहे.

Updated : 11 Jun 2020 6:31 PM GMT
Next Story
Share it
Top