Home > News Update > 'हा' जिल्हा कोरोनामुक्तीकडे...

'हा' जिल्हा कोरोनामुक्तीकडे...

हा जिल्हा कोरोनामुक्तीकडे...
X

सलग चार दिवसांपासून नवा कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. आज गोंदिया जिल्ह्यात 21जून रोजी एक कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे.त्यामुळे जिल्ह्यात आता क्रियाशील कोरोना रुग्ण 32 आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 102 कोरोना बाधित रुग्ण आढळले.70 रुग्ण उपचारातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता 32 क्रियाशील रुग्ण आहेत.आज जो रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे तो तिरोडा तालुक्यातील असून तो 20 ते 30 वर्ष वयोगटातील आहे.

102 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका - 31,सडक/अर्जुनी तालुका - 10, गोरेगाव तालुका - 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका - 2, गोंदिया तालुका - 22 आणि तिरोडा तालुक्यातील 32 रुग्ण आहे.

गोंदियाच्या प्रयोगशाळेत 1814 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने पाठविण्यात आले.102 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.85 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.70 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 899 आणि घरी 1814 अशा एकूण 2858 व्यक्ती विलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली

Updated : 21 Jun 2020 7:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top