Home > News Update > ‘संघाची आरक्षण हटवण्याची उर्मी, इच्छा सातत्याने उफाळून येत असते’- सचिन सावंत

‘संघाची आरक्षण हटवण्याची उर्मी, इच्छा सातत्याने उफाळून येत असते’- सचिन सावंत

‘संघाची आरक्षण हटवण्याची उर्मी, इच्छा सातत्याने उफाळून येत असते’- सचिन सावंत
X

“३७० कलमाप्रमाणे आरक्षण देखील रद्द करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. संघाची विचारधारा मनुवादाला समर्थनीय आहे त्यामुळे आरक्षण हटवण्याची उर्मी, इच्छा सातत्याने उफाळून येत असते.” असे मत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले.

“आरक्षण हा विषय सातत्याने चर्चेत आणला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकही वेळोवेळी याचे समर्थन करतात. काँग्रेस पक्ष नेहमी मनुवादी विचारधारेविरुद्ध लढत राहील. दलित, पीडित आणि शोषित समाजानेही आपल्या अधिकारांसाठी जागृत राहण्याचे आवाहन करत आहोत.” असे सचिन सावंत यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितले.

Updated : 26 Aug 2019 1:39 PM GMT
Next Story
Share it
Top