Home > News Update > न बदलता येणाऱ्या 370 कलमाचा चा इतिहास लक्षात घ्यावाच लागेल - असिम सरोदे

न बदलता येणाऱ्या 370 कलमाचा चा इतिहास लक्षात घ्यावाच लागेल - असिम सरोदे

न बदलता येणाऱ्या 370 कलमाचा चा इतिहास लक्षात घ्यावाच लागेल - असिम सरोदे
X

हिंदू राजा हरिसिंग यांनी जम्मू-काश्मीर मध्ये 370 कलम चा आग्रह धरला, भारतात येण्यासाठी ती अट ठेवली आणि आज ते कलम हटविण्यास पुढाकार घेण्यात येतोय हे चांगले आहे. लोकशाही प्रक्रिया व पारदर्शक घटनात्मक पद्धतीने 'due process of law' पाळून झाले पाहिजे इतकेच म्हणावे. जम्मू व काश्मीर तसेच लदाख असे विभाजन केल्याने आता मुळातील राज्य राहिलेच नाहीये मग 370 कलमाचा प्रभाव राहील का हा संविधात्मक प्रश्न चर्चेत राहील.

1963 मध्ये 13 वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्यात 370 ही तरतूद ' अस्थायी व संक्रमणी' करण्यात आल्याने आज 370 कलमातील काही भाग रद्द करावा व 35 अ कलम रद्द करावे ही शिफारस राष्ट्रपतींना करणे संसदेला शक्य झाले आहे. भाजपने नक्कीच धडाडीचा निर्णय घेतला आहे यासाठी अभिनंदन. भूगोल बदलता येईल पण न बदलता येणाऱ्या 370 चा इतिहास जरूर लक्षात घ्यावाच लागेल.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2897322993826390/

Updated : 5 Aug 2019 9:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top