Home > News Update > राजू शेट्टी आमदार होणार का? अखेर निर्णय झाला!

राजू शेट्टी आमदार होणार का? अखेर निर्णय झाला!

राजू शेट्टी आमदार होणार का? अखेर निर्णय झाला!
X

भाजपची साथ सोडल्यानंतर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. सरकारमध्ये मात्र, मित्र पक्षा़ंना स्थान मिळाले नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर दिली. मात्र, राजू शेट्टी यांनी ती स्वीकारलीही पण पक्षांतर्गत नाराजीमुळे राजू शेट्टी यांनी ही ऑफर नाकारण्याबाबत भाष्य केलं होतं.

मात्र, पक्षातील नेत्यांची नाराजी दूर करण्यास राजू शेट्टी यांना यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळं राज्यपालांच्या कोट्यातून मिळणारे आमदारकीचे पद स्वीकारण्या संदर्भात संघटनेचे एकमत झालं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Updated : 20 Jun 2020 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top