‘श्रेय लाटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘या’ पुलाचं उद्घाटन केलं नाही’

बीकेसी चुनाभट्टी उड्डाणपूलासाठी आमचं सरकार असताना, या विभागाचा आमदार असताना मी मंजुरी घेतली होती. आघाडी सरकारच्या काळामध्ये हे काम सुरु झालं. गेले दीड महिने उड्डाणपूल तयार आहे पण, कुठेतरी मुख्यमंत्र्याना याचं श्रेय घ्यायचंय.

एसएलआरवर अर्धा पाऊण तास गाड्या थांबतात. बीकेसी मध्ये ट्राफिक होतंय आणि मुख्यमंत्र्याना फोटोशॉप करण्यासाठी ह्या उड्डाणपूलाच उद्घाटन थांबवून ठेवण्यात आलं आहे. आमच्या काळामध्ये एसएलआरची कामं पूर्ण झाली होती. २०१४ ला आचारसंहिता असताना तो पूल उघडण्यात आला होता.

हे ही वाचा

मुख्यमंत्रांच्या हातून फीत कापून लोकांना वेठीस धरणं हे योग्य नाही. जर त्यांना आम्हाला अटक करायची असेल तर आमची अटक होण्याची तयारी आहे. पण आमचं एकच म्हणणं आहे जनहितासाठी हे आमचं आंदोलन आहे. आजच हा पूल जनतेसाठी उघडण्यात यावा.

७ तारखेला नरेंद्र मोदींच्या हस्ते उड्डाणपुलाचे उदघाटन ठरवण्यात आले होते. मोदी साहेबांनी स्वतः सांगितलं होत की उड्डाणपूल चालू झाला आहे. म्हणजे कुठेतरी हे कामं पूर्ण होत असताना श्रेय घेण्याची नाटकं या सरकारची आहेत. मी मुख्यमंत्र्याना इशारा देतोय तुम्ही तात्काळ हा पूल चालू करा अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.