Home > News Update > तेजस्वी यादव यांचं पुनरागमन करत असल्याचं ट्वीट

तेजस्वी यादव यांचं पुनरागमन करत असल्याचं ट्वीट

तेजस्वी यादव यांचं पुनरागमन करत असल्याचं ट्वीट
X

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे लोकसभा निवडणुकीनंतर गायब झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांनी ट्वीट करून या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

तेजस्वी यादव ट्विटमध्ये म्हणाले की, मित्रांनो लिगामेंट आणि एसीएल दुखापतीमुळे मी गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होतो. त्यावर उपचार घेण्यात आपण व्यस्त होतो. परंतु, माझ्या राजकीय विरोधकांचे आणि मीडियातील एका गटाच्या माझ्याविषयीच्या गंमतीदार स्टोरींचा मी आनंद घेत होतो, असंही तेजस्वी म्हणाले.

तसेच चमकी तापीमुळे बिहारमध्ये शेकडो मुलांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी तेजस्वी यादव कुठं आहे, असे सवाल उपस्थित झाले होते. मात्र आरजेडीच्या पदाधिकाऱ्यांना त्याचवेळी पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच संसदेत हा प्रश्न उठविण्यास सांगितले होते, असंही तेजस्वी म्हणाले.

Updated : 29 Jun 2019 8:52 AM GMT
Next Story
Share it
Top